अमृत संस्थेतर्फे सत्कार करून करण्यात आले अभिनंदन
अहिल्यानगर : राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आठ मे रोजी जाहीर झाला. त्या परीक्षेत अहिल्यानगरमधील रेणावीकर विद्यामंदिर येथील गौरी मुकेश साठ्ये हिला ९९.६० टक्के गुण मिळाले. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक गुण मिळवण्याचा मान तिने मिळवला. या यशाबद्दल अमृत संस्थेच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यालयात तिचे अभिनंदन करण्यात आले. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यातील वाटचालीसाठी अमृत संस्था नक्की सहकार्य करील, असेही सांगितले. अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या शुभेच्छांचे पत्र गौरीला देण्यात आले. या वेळी गौरी साठ्ये हिचे आई-वडीलदेखील उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
अमृत जिल्हा कार्यालय : 9112228769
जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणीसमोर,
प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment