मालेगावमधील सोनज येथील प्रथमेश कुलकर्णींची मुंबई पोलिसांत निवड

अमृत संस्थेच्या नाशिक कार्यालयातर्फे अभिनंदन आणि शुभेच्छा!

मालेगावमधील सोनज येथील प्रथमेश कुलकर्णींची मुंबई पोलिसांत निवड मुख्य फोटो
मालेगावमधील सोनज येथील प्रथमेश कुलकर्णींची मुंबई पोलिसांत निवड अतिरिक्त फोटो

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील सोनज गावातील प्रथमेश नरेंद्र कुलकर्णी यांची मुंबईच्या पोलीस विभागात नियुक्ती झाली आहे. कुलकर्णी हे राज्य शासनाच्या अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील असून, अमृत संस्थेच्या नाशिक कार्यालयातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. मुंबई पोलिसांत निवड झालेले प्रथमेश कुलकर्णी हे अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील पहिलेच उमेदवार असून, त्यांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.

कुलकर्णी यांच्या सत्कारावेळी अमृत संस्थेचे नाशिक जिल्हा व्यवस्थापक दीपक गुप्ता, अमृतमित्र अजिंक्य कन्नल, प्रथमेश यांचे वडील नरेंद्र कुलकर्णी, भाऊ कल्पेक्ष कुलकर्णी, काका मंगेश कुलकर्णीआणि राजेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. जिद्द आणि आई-वडिलांचे आशीर्वाद यांमुळे प्रथमेश यांना हे यश प्राप्त झाले असून, लक्ष्यित गटातील मुला-मुलींनी पोलीस भरतीसाठी अभ्यास करावा आणि मेहनत व चिकाटी ठेवावी, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

प्रथमेश कुलकर्णी यांच्या या यशाबद्दल सोनज परिसरातून आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. समाजाची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. 

Publisher: दिपक गुप्ता , नाशिक जिल्हा व्यवस्थापक News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 12:12 PM News publication time | Views: 893 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: दिपक गुप्ता , नाशिक जिल्हा व्यवस्थापक News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 12:12 PM News publication time | Views: 893 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement