अष्टविनायक यात्रेतील तीर्थक्षेत्र
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील गणपती मंदिर महाराष्ट्रात अत्यंत प्रसिद्ध असून, ते पुणे-नगर महामार्गावर आहे. रांजणगावचा गणपती अष्टविनायकांपैकी एक असून, तो महागणपती या नावाने ओळखला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी येथे गणपतीची पूजा केली होती. मंदिराची रचना पेशव्यांच्या काळातील असून, ते अत्यंत भव्य आणि आकर्षक आहे.
मंदिरातील मूर्ती विशेष आहे. असे मानले जाते, की मूर्तीच्या मागे एक अधिक गुप्त (मोठी) मूर्ती आहे आणि ती विशेष प्रसंगीच दर्शवली जाते. मंदिर पूर्वाभिमुख असल्याने सकाळच्या सूर्यकिरणांचा थेट प्रकाश गणपतीवर पडतो.
अष्टविनायक यात्रेतील हा गणपती असून, गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थीला येथे मोठी गर्दी असते. गणेशोत्सवाच्या काळात महागणपतीला जलाभिषेक करण्याची प्रथा आहे. पंचक्रोशीतील गणपतीच्या पाच बहिणींना पालखीची प्रदक्षिणा असते. या कालावधीत चार दिवस गणपतीला स्वतःच्या हाताने जलाभिषेक करण्याची पारंपरिक पद्धत आहे.
गणेश मंदिराच्या आजूबाजूला राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. देवस्थानात श्री वेंकटेश्वरा उत्तरा फूड्स कंपनीकडून अन्नप्रसाद वाटप केला जातो. सध्या मंदिराची सुधारणा आणि डागडुजीचे मोठे काम चालू आहे. त्या निमित्ताने १५ एप्रिल ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. या कालावधीत नित्यपूजा होणार असून, बाहेर मोठ्या स्क्रीनवर गणपती दर्शन घेण्याची व्यवस्था केलेली आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment