उद्योजक व शेतकरी अनिल मोहटकर यांचा पुढाकार
फलटण : सातारा जिल्ह्याच्या तालुक्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी शेतीमित्र गांडूळखत प्रकल्प प्रभावीपणे कार्यरत आहे. या उपक्रमासाठी उद्योजक व प्रगतिशील शेतकरी अनिल मोहटकर यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. नैसर्गिक शेतीचा प्रसार आणि शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
गांडूळ खतामुळे जमिनीची सुपीकता वाढते, माती भुसभुशीत होते, तसेच मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. यामुळे पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होत आहे, असे शरद महानवर यांनी सांगितले. रासायनिक खतांचा वाढता वापर कमी करून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतीमित्र गांडूळ खतामध्ये नैसर्गिक नत्र-स्फुरद-पालाश (Natural NPK), सेंद्रिय कर्ब (Organic Carbon), सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच उपयुक्त जिवाणूंचा समावेश असल्याने ऊस, गहू, कांदा, टोमॅटो, भाजीपाला, फळबाग आणि फुलशेतीसाठी हे खत उपयुक्त ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांनी या खताचा वापर करून सकारात्मक अनुभव मिळाल्याचे सांगितले.
फलटण तालुक्यात सेंद्रिय शेतीचा प्रसार वाढवून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment