अजिंठा डोंगररांगेतील केळगावचे मुर्डेश्वर महादेव मंदिर

निसर्गरम्य परिसरातील प्राचीन हेमाडपंती वास्तू असलेले श्रद्धास्थान

अजिंठा डोंगररांगेतील केळगावचे मुर्डेश्वर महादेव मंदिर मुख्य फोटो
अजिंठा डोंगररांगेतील केळगावचे मुर्डेश्वर महादेव मंदिर अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील प्राचीन मुर्डेश्वर महादेव मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले असे हे ठिकाण आहे. अजिंठा डोंगररांगांच्या निसर्गरम्य परिसरात, खोल दरीच्या टोकावर वसलेले हे मंदिर भाविक आणि पर्यटकांनाही आकर्षित करते. राज्य शासनाने या मंदिराला ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्राचा दर्जा दिल्याने या स्थळाच्या महत्त्वात अधिक भर पडली आहे.

स्थानिक आख्यायिकेनुसार, प्रभू श्रीरामांनी सीतेच्या पूजेसाठी येथे शिवलिंगाची स्थापना केली होती. शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर श्रीरामांनी खानदेशाकडे वळून पाहिले. त्यामुळे या क्षेत्राला ‘मुर्डेश्वर’ हे नाव पडल्याची मान्यता आहे. पुढे यादवकालात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असल्याचे सांगितले जाते.

हेमाडपंती स्थापत्यशैलीतील या मंदिराचे बांधकाम पूर्णपणे दगडात करण्यात आले असून, सभामंडप, गर्भगृह, दगडी खांबांवरील नक्षीकाम, विविध शिल्पकला आणि प्राचीन कोरीव लेख पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या परिसरातील भक्कम दगडी तटबंदी किल्ल्याची आठवण करून देते.

मंदिर परिसरातून खानदेशातील अनेक गावांचे विहंगम दृश्य दिसते. हिरवीगार वनराई, खोल दऱ्या आणि शांत वातावरणामुळे येथे धार्मिक पर्यटकांसोबतच निसर्गप्रेमींचीही मोठी गर्दी असते. मंदिर परिसरात श्रीराम-सीता, हनुमान, गणपती, शनिदेव, तसेच इतर देवतांची मंदिरे आहेत.

श्रावण महिन्यात येथे विशेष उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक श्रावणी सोमवारी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या काळात परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो.

Publisher: योगेश भास्करराव रोडे News publisher name | Date: 26-05-2026 News publication date | Time: 10:38 PM News publication time | Views: 104 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: योगेश भास्करराव रोडे News publisher name | Date: 26-05-2026 News publication date | Time: 10:38 PM News publication time | Views: 104 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement