वैयक्तिक व्याज परतावा योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील श्री. ऋग्वेद अशोक कुलकर्णी यांना ₹१,११,१९७ इतका व्याज परतावा मिळाला.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा आणखी एक लाभार्थी समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील श्री. ऋग्वेद अशोक कुलकर्णी यांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत ₹१,११,१९७ इतकी व्याज परताव्याची रक्कम जमा झाली.
श्री. कुलकर्णी यांनी ट्रान्सपोर्ट वाहन खरेदीसाठी चोलामंडलम बँकेकडून कर्ज घेतले होते. कर्जाचे सर्व हप्ते नियमितपणे भरल्यानंतर अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेअंतर्गत त्यांना एका वर्षाच्या व्याजाची रक्कम परत मिळाली. ही रक्कम त्यांच्या बचत खात्यात जमा झाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त करत अमृतच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयाला भेट दिली.
यावेळी त्यांनी अमृतच्या या योजनेमुळे आर्थिक दिलासा मिळाल्याचे सांगितले. तसेच व्याज परताव्याची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतरचा स्वतःचा अनुभव सांगणारा व्हिडिओही त्यांनी तयार करून दिला. अमृतच्या विविध योजनांचा लाभ समाजातील पात्र नागरिकांनी घ्यावा आणि स्वतःच्या प्रगतीसाठी या संधींचा उपयोग करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अमृत स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून विविध आर्थिक, शैक्षणिक व कौशल्यविकास योजनांचा लाभ लक्षित गटातील नागरिकांना दिला जात आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनांची माहिती घेऊन जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी अमृत स्वायत्त संस्था तसेच जिल्हा टीमच्या वतीने श्री. ऋग्वेद अशोक कुलकर्णी यांचे अभिनंदन करण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
अधिक माहितीसाठी संपर्क : अमृत विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिकनगर रोड, सेक्टर-४, सिडको, हनुमान नगर पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर – ४३१००९. मो. क्र. : ७३९१०६५४७५ / ९४०३२००६०६.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment