NEET मध्ये ऑल इंडिया 906 वा, महाराष्ट्रात 44 वा क्रमांक; वैद्यकीय शिक्षणासाठी AIIMS रायपूरची निवड
NEET-UG 2026 परीक्षेत अविराज देशपांडे यांनी उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या मेहनतीचे आणि जिद्दीचे उत्तम उदाहरण साकारले आहे.
अविराज यांनी अखिल भारतीय स्तरावर 906 वा क्रमांक, राज्यस्तरावर 44 वा क्रमांक तर कॅटेगरीमध्ये 535 वा क्रमांक मिळवला आहे. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्यांची AIIMS रायपूर (All India Institute of Medical Sciences, Raipur) येथे वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली आहे.
अविराज यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, सातत्य, समर्पण आणि ध्येयाप्रती असलेली जिद्द महत्त्वाची ठरली. त्यांच्या यशामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि मार्गदर्शकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. “स्वप्न मोठे असावे, मेहनत सातत्यपूर्ण असावी आणि ध्येय निश्चित असावे” याचे उत्तम उदाहरण अविराज देशपांडे यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment