संत तुकाराम महाराजांचा अभंग
राम म्हणे वाट चाली ।
यज्ञ पाउला पाउलीं ।।१।।
धन्य धन्य तें शरीर ।
तीर्थव्रतांचे माहेर ।।२।।
राम म्हणे करिता धंदा ।
सुख समाधी त्या सदा ।।३।।
राम म्हणे ग्रासोग्रासीं ।
तोचि जेवला उपवासी ।।४।।
राम म्हणें भोगीं त्यागी ।
कर्म न लिंपे त्या अंगी ।।५।।
ऐसा राम जपे नित्य ।
तुका म्हणे तो जीवन्मुक्त ।।६।।
- संत तुकाराम महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment