युद्धखोर अमेरिका - अमृत महाराष्ट्र

युद्धखोर अमेरिका

सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, अतुल कहाते लिखित 'युद्धखोर अमेरिका' या पुस्तकाचा परिचय...

युद्धखोर अमेरिका मुख्य फोटो
मुख्य फोटो

कधी कधी आपल्याला दिसणारे चित्र आणि त्यामागचे खरे वास्तव खूपच वेगळे असते. आजच्या युगात परिस्थिती पटापट बदलते आहे. जागतिक राजकारणात घडणाऱ्या घटना आणि त्याचे भारतावर होणारे परिणाम आपण वाचतोय, पाहतोय. सध्या अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेले युद्ध आपण पाहतोच आहोत. अमेरिका असे का करते, त्यामागचा त्यांचा हेतू काय असेल, याविषयी आपल्याला अनेक प्रश्नही पडत असतील. या सगळ्याची उत्तरे इतिहासात दडलेली आहेत. ही उत्तरे शोधायची असतील, तर अतुल कहाते यांनी लिहिलेले अमेरिका आणि जागतिक राजकारण याविषयी सविस्तर माहिती देणारे ‘युद्धखोर अमेरिका’ हे पुस्तक वाचायलाच हवे.

जगातील सगळ्यात मोठा युद्धखोर देश कोणता, असा प्रश्न विचारला, तर अमेरिका हे त्याचे उत्तर कोणीही झटकन सांगील. सध्या आपण अमेरिका आणि इराण यांचे युद्ध पाहतच आहोत. धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी, सगळ्या जगाच्या संरक्षणासाठी झटणारी अत्याधुनिक विचारसरणीची, धर्मांध शक्तींशी लढणारी अशी अमेरिकेची प्रतिमा अमेरिकेतील आणि अमेरिका पुरस्कृत माध्यमांनी ठसवलेली आहे. परंतु जगातील अनेक देशांत अमेरिकेने कशा प्रकारे घुसखोरी करून त्या देशाची ओळख पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळते. मग ती हवाई बेटे असतील, क्यूबा, फिलिपिन्स हे अमेरिका खंडातील देश असोत किंवा इराण, व्हिएतनाम, चिली, पनामा, अफगाणिस्तान, इराक अशी राष्ट्रे असोत, जिथे जिथे अमेरिकेचा स्वार्थ होता, तिथे तिथे त्यांनी वेगवेगळ्या कारणांनी युद्धे केली. आपल्या सामर्थ्याच्या जोरावर त्या देशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. हे सगळे आपण जगात शांतता नांदावी म्हणून करत आहोत, असा कांगावाही अमेरिकेने केला आहे. हे पुस्तक वाचताना आपल्याला आजच्या जागतिक स्थितीची कल्पना येईल आणि भारताने अमेरिकेसारख्या बलशाली देशासमोर न झुकण्याची सत्यता लक्षात येईल. या सगळ्यामागचे वास्तव खूपच भयावह आणि सावध व्हावे असे आहे. म्हणूनच आवर्जून वाचावे आणि संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.

पुस्तकाचे नाव - युद्धखोर अमेरिका

लेखक - अतुल कहाते

प्रकाशक - रोहन प्रकाशन

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 24-03-2026 News publication date | Time: 11:18 AM News publication time | Views: 19 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 24-03-2026 News publication date | Time: 11:18 AM News publication time | Views: 19 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement