हा तेल नावाचा इतिहास आहे! - अमृत महाराष्ट्र

हा तेल नावाचा इतिहास आहे!

सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, 'हा तेल नावाचा इतिहास आहे' या गिरीश कुबेरलिखित पुस्तकाचा परिचय...

हा तेल नावाचा इतिहास आहे! मुख्य फोटो
मुख्य फोटो

खनिज तेल उत्पादनात आखाती देशांचे असलेले महत्त्व आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीचे महत्त्व सगळ्या जगाला माहिती आहेच; पण सध्या हे महत्त्व प्रत्येक देश अनुभवतो आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ सगळ्या जगाला बसते आहे. 'तेल म्हणजे आखाती देश आणि आखाती देश म्हणजे तेल' असे समीकरण आहे. त्या समीकरणात या युद्धामुळे बाधा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, हे सारे गणित अभ्यासण्यासाठी 'हा तेल नावाचा इतिहास आहे!' हे गिरीश कुबेरलिखित पुस्तक वाचायलाच हवे.

जगभरातील अर्थकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या तेलाच्या महत्त्वपूर्ण स्थानाला न्याय देणारे हे इतिहासलेखन आहे. या पुस्तकात तेलाच्या अनुषंगाने आखाती देशांची 'तेल'कथाही वाचायला मिळते. गिरीश कुबेरांच्या तेल इतिहासाच्या मालिकेमधील हे पहिले पुस्तक. तेल कधी व कसे सापडले, त्यानंतर त्या तेलामुळे औद्योगिक क्रांती कशी झाली व जागतिक राजकारण कसे घडले याबद्दलचा सर्व इतिहास या पुस्तकात आहे. तेलाचा हक्क मिळवण्यासाठी आधी उद्योजकांची आणि मग बलाढ्य देशांची झालेली चढाओढ आपणास या पुस्तकात पाहायला मिळते. भारत या शर्यतीत कसा आला आणि त्यामागे कोणाचा वाटा होता, हेपण आपल्याला कळते. 

लेखक गिरीश कुबेर यांची चौकस नजर जगभरात फिरून अनुभवसंपन्न झाली असल्याचा प्रत्यय यातून येतो. तेलाचा हा राजकीय इतिहासही आहे. अमेरिका, भारत, चीन, इस्रायल, रशिया या देशांतील तेलाचे राजकारण, स्टँडर्ड ऑइलचे साम्राज्य, ओपेक ही संघटना, ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म अशा तेलाच्या अनेक बाजू पुस्तकातून जाणून घेता येतात. आर्थिक, राजकीय, लष्करी आणि विज्ञानाच्या अंगाने लिहिलेली ही कथा समकालीन वास्तव रंगवते. लेखकाने परिपूर्ण अभ्यास करून लिहिलेले हे पुस्तक अर्थशास्त्र, जागतिक व भौगोलिक राजकारण हे विषय आवडणाऱ्यांनी जरूर वाचावे.

पुस्तक - हा तेल नावाचा इतिहास आहे!

लेखक - गिरीश कुबेर

प्रकाशक - राजहंस प्रकाशन

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 24-03-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 28 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 24-03-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 28 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement