संत भानुदास महाराजांचा अभंग
श्रीराम आम्हां सोयरा सांगती ।
नाहीं पुनरावृत्ती जन्म कर्म ।।१॥
तुटती यातना देहाचा संबंध ।
श्रीराम बोध ठसतां जीवा।।२।।
येरझार खुंटली वासना तुटली ।
वृत्ती हे जडली श्रीराम पाय ।।३।।
भानुदास म्हणे कुळींचे दैवत ।
श्रीराम समर्थ अयोध्येचा ।।४।।
- संत भानुदास महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment