अहिल्यानगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदी शाळा - अमृत महाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदी शाळा

आधार आपुलकी फाउंडेशनचा उपक्रम

अहिल्यानगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदी शाळा मुख्य फोटो
अहिल्यानगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदी शाळा अतिरिक्त फोटो

ज्येष्ठ नागरिकांचे उर्वरित आयुष्य आनंदी जाण्यासाठी अहिल्यानगरमध्ये आधार आपुलकी फाउंडेशनच्या माध्यमातून हेमंत लोहगावकर यांनी आनंदी शाळा हा उपक्रम सुरू केला आहे. संसाराच्या जबाबदार्‍या पार पाडत असताना ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील, त्या या शाळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. काहींना चित्रे काढायची होती, काहींना गाणे शिकायचे होते, काहींना ट्रेकला जायचे होते, अशा अनेक इच्छा पूर्ण करता आलेल्या नसतात. या आणि अशा काही गोष्टी या शाळेत करण्याची संधी उपलब्ध आहे. येथे डिजिटल ट्रेनिंग हॉलही आहे. त्यात या ज्येष्ठांना स्मार्टफोन कसा वापरायचा, ऑनलाइन पेमेंट कसे करायचे, अशा प्रकारची काळाच्या गरजेनुसार आवश्यक आधुनिक प्रशिक्षणे दिली जातील.

ही पिढी खूप अनुभवसंपन्न असली, तरी त्यांचे अनुभव, मार्गदर्शन ऐकायला कोणी नसते, असा सार्वत्रिक अनुभव असतो. म्हणून दर शनिवारी या शाळेत आपुलकीचा कट्टा येथे असणार आहे. तेथे ते मनमोकळेपणाने गप्पा मारू शकतात. तसेच मेडिटेशन रूम, लायब्ररीही येथे आहे. एक गेमझोन असून, तेथे त्यांना त्यांच्या काळातील सागरगोटे, काचपाणी, पत्ते, कॅरम इत्यादी खेळ खेळता येतील. त्यांच्या वयाला साजेसा कॅफेही असेल आणि तेथे त्यांना त्यांच्या वयाला पचतील, रुचतील असे पदार्थ खायला मिळतील. तसेच जुन्या काळातील सिनेमे, गाणीही पाहता येतील. 

या उपक्रमाचे स्वागत होत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अमृत संस्थेकडूनही त्यांना शुभेच्छा!

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 04-02-2026 News publication date | Time: 11:31 AM News publication time | Views: 211 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 04-02-2026 News publication date | Time: 11:31 AM News publication time | Views: 211 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement