समर्थ रामदासस्वामींची रचना
उतावेळ चित्त भेटीचें आरत ।
पुरवी मनोरथ मायबापा ।।१।।
रात्रंदिस जीव लागलास झासा ।
उच्चाट मानसा वाटतसें ।।२।।
पराधीन जीणें काये करूं रामा ।
नेई निजधामा माहियेरा ।।३।।
तुजवीण रामा मज कोण आहे ।
विचारून पाहे मायबापा ।।४।।
रामी रामदास बहु निर्बुजला ।
मीतूपणा ठेला बोळवोनी ।।५।।
- समर्थ रामदासस्वामी (संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment