इतिहास, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा वारसा
श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली यांच्या वतीने यंदाच्या १०२ व्या गणेशोत्सवानिमित्त “एक वही, एक पेन” हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे. डोंबिवली ही केवळ निवासी व औद्योगिक नगरी नसून, कला, साहित्य, संगीत, शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि मराठी संस्कृतीचा समृद्ध वारसा जपणारे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखली जाते.
गोंदियापासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर प्राचीन हेमाडपंथी मंदिर; ऐतिहासिक वारसा आणि श्रद्धेचा अनोखा संगम
पुणे शहराच्या मातीत इतिहासाचा सुगंध आहे, पेशव्यांच्या आठवणी आहेत आणि प्रत्येक पुणेकराच्या मनात गणपती बाप्पासाठी एक विशेष जागा आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाची भव्य परंपरा जेव्हा डोळ्यांसमोर उभी राहते, तेव्हा सर्वप्रथम आठवतो तो पुण्याचा मानाचा पहिला गणपती – श्री कसबा गणपती! 🚩 कसबा पेठेतील या गणरायाला पुण्याचे ग्रामदैवत मानले जाते. शेकडो वर्षांची श्रद्धा, परंपरा आणि इतिहास आपल्या कुशीत जपणारा हा गणपती आजही लाखो भाविकांच्या मनातील श्रद्धास्थान आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या जीवनात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घराघरांत भक्तिभावाने साजरा होणारा गणेशोत्सव पुण्यात सार्वजनिक स्वरूपात रुजला आणि पुढे तो लोकजागृती, सामाजिक एकजूट, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि राष्ट्रीय विचारांचे प्रभावी व्यासपीठ बनला. आजच्या भव्य गणेशोत्सवामागे पुण्याच्या इतिहासाशी जोडलेली समृद्ध परंपरा आहे. पुण्यात गणपतीची उपासना पेशवेकालापासूनच महत्त्वाची मानली जाते. पेशव्यांच्या काळात गणेशोत्सवाला राजाश्रय मिळाला आणि पुण्यातील विविध वाड्यांमध्ये गणेशपूजा, धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक सोहळे होत असत. त्यामुळे गणेशोत्सव हा पुण्याच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला. कालांतराने घरगुती गणेशोत्सवाची परंपरा कायम राहिली; मात्र १८९३ मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक सामाजिक स्वरूप देण्यास सुरुवात केली, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. त्या काळात ब्रिटिश राजवटीखाली सार्वजनिक राजकीय सभा आणि लोकसंघटनांवर विविध निर्बंध होते.
श्रीकृष्ण म्हटले की डोळ्यांसमोर येते ती त्यांची खट्याळ बाललीला, गोकुळातील मित्रांसोबतचा निरागस खेळ, दही-दुधाची चोरी आणि माखनासाठी केलेली मजा. याच गोकुळातील आनंदी, सामूहिक आणि बंधुभावाच्या वातावरणाची आठवण करून देणारी परंपरा म्हणजे ‘गोपाळकाला’.
श्रीकृष्ण म्हटले की डोळ्यांसमोर येते ती त्यांची खट्याळ बाललीला, गोकुळातील मित्रांसोबतचा निरागस खेळ, दही-दुधाची चोरी आणि माखनासाठी केलेली मजा. याच गोकुळातील आनंदी, सामूहिक आणि बंधुभावाच्या वातावरणाची आठवण करून देणारी परंपरा म्हणजे ‘गोपाळकाला’.
अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूरचे भूमिपुत्र राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरी यांची अयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या महासचिवपदी सर्वानुमते नियुक्ती झाली. त्यांच्या या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
श्रावण महिना म्हणजे भगवान शंकराच्या भक्तीचा, आराधनेचा आणि आध्यात्मिक उत्साहाचा काळ. महाराष्ट्रातील अनेक प्राचीन शिवमंदिरांमध्ये मराठवाड्यातील बीड शहरातील श्री कंकालेश्वर मंदिर हे स्थापत्यकला, इतिहास आणि धार्मिक परंपरेचा अद्वितीय संगम मानले जाते.
श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरी होणारी नारळी पौर्णिमा हा महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेतील महत्त्वाचा सण आहे. विशेषतः समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळी समाजासाठी या दिवसाला धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून समुद्रदेवतेची पूजा केली जाते आणि सुरक्षित, समृद्ध मासेमारी हंगामासाठी प्रार्थना केली जाते.
श्रावण महिना म्हटला की वातावरणात भक्तीचा सुगंध दरवळू लागतो. मंदिरांमध्ये घुमणारा ‘हर हर महादेव’चा जयघोष, बेलपत्रांचा सुगंध, शिवलिंगावर होणारा अभिषेक आणि ओठांवर उमटणारे ‘ॐ नमः शिवाय’चे नामस्मरण यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय होते. श्रावणातील प्रत्येक सोमवार हा भगवान महादेवाच्या आराधनेसाठी विशेष मानला जातो. या दिवशी उपवास, अभिषेक, बेलपत्र अर्पण यासोबतच महाराष्ट्राच्या अनेक भागांत ‘शिवमूठ’ अर्पण करण्याची सुंदर आणि भावस्पर्शी परंपरा आजही जपली जाते.
श्रावण महिन्यात भालगाव येथील काशी विश्वनाथ मंदिरात भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. विशेषतः श्रावणी सोमवारी महादेवांना विविध रूपांमध्ये आकर्षक अलंकार व साजशृंगार केला जात असून हे मनोहारी रूप भाविकांचे आकर्षण ठरत आहे. अभिषेक, पूजा आणि हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे.
श्रावण महिन्यातील शनिवारी खुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रा मारुती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. निद्रिस्त अवस्थेतील मारुतीची मूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य असून, नवसाला पावणारे दैवत म्हणून भद्रा मारुतीची ख्याती आहे.
पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त सोलापूर मधील श्री सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; बाळीवेसच्या मल्लिकार्जुन मंदिरातही धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल!
जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ. कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय? आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात.
श्रावण महिना हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि भक्तिमय महिना मानला जातो. या महिन्यात भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते. श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन यांसारखे अनेक सण श्रावण महिन्यात येतात.
श्रावण मासाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. भगवान शिवांची आराधना, जलाभिषेक, बेलपत्र अर्पण आणि ‘ॐ नमः शिवाय’ नामस्मरणातून भक्तीभाव वृद्धिंगत होतो. पावसाळ्यात निसर्ग बहरत असल्याने वृक्षसंवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरण रक्षणाचा संदेशही श्रावण देतो. शुद्ध मन, चांगले विचार, सद्कर्म आणि निसर्गप्रेम हाच या पवित्र महिन्याचा खरा संदेश आहे.
दीप अमावस्या का साजरी करतात? वाचा या सणाचे सांस्कृतिक, अध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्वदीप अमावस्या साजरी करण्यामागे काय आहे अध्यात्मिक आणि वैज्ञानिक रहस्य? जाणून घ्या सविस्तर
आषाढ महिना सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळेच चैतन्य संचारते. गावोगावी टाळ-मृदंगांचा निनाद घुमू लागतो. "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात
वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या पंथाने स्त्रियांना केवळ भक्तीचेच स्वातंत्र्य दिले नाही, तर त्यांना संतत्वाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन बसवले. जाणून घेऊया अशाच एका मातृशक्तीची भक्तीगाथा -
तुळशीची माळ, कपाळी बुक्का अन् काळजावर विठ्ठल संतांच्या विचारांनी घडवलेली 'महाराष्ट्र क्रांती'!"
जाणून घेऊया भारतीय भोजन परंपरेमागचे विज्ञान!
महाराष्ट्राच्या संतपरंपरेत श्री गोंदवलेकर महाराज यांचे स्थान अत्यंत मानाचे आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे आणि विचारांचे स्मरण करणे म्हणजे जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या एका महान संताला अभिवादन करणे होय.
भारत हा सण-उत्सवांचा देश आहे. आपल्या देशातील प्रत्येक सणामागे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व दडलेले असते. अशाच महत्त्वपूर्ण सणांपैकी वटपौर्णिमा हा एक पवित्र आणि पारंपरिक सण आहे.
निर्जला एकादशी म्हणजे सर्व एकादशींचे पुण्य देणारे श्रेष्ठ व्रत ,जाणून घेऊया या विशेष दिवसाची माहिती.
धार्मिक ग्रंथांनुसार निर्जला एकादशीचे व्रत केल्यास सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त होते. ही एकादशी श्रद्धा, संयम आणि ईश्वरभक्तीचा संदेश देते.
आध्यात्म की शुरुआत तब होती है, जब मन स्वयं से प्रश्न पूछना शुरू करता है।
प्रदोष व्रताचे माहात्म्य सांगणारा हा लेख-
आजच्या अस्थिर काळात गौतम बुद्ध यांचे विचार म्हणजे केवळ तत्त्वज्ञान नाहीत, तर जगण्याची एक व्यावहारिक दिशा आहेत... बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने चिंतनपर लेख...
दासनवमीनिमित्त त्यांच्या विचारांचा एक धावता आढावा
ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांच्या जयंतीनिमित्त (माघ शुद्ध द्वादशी) त्यांच्या विचारांचा धांडोळा...
मार्गशीर्ष शुक्ल एकादशी अर्थात मोक्षदा एकादशी या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते. श्रीमद्भगवद्गीता हा मानवी जीवनाचं सार सांगितलेला महान ग्रंथ आहे, हे आपल्याला माहिती आहेच. झोंपाळ्यावरची गीता ही १००हून अधिक वर्षांपूर्वी कवी अनंततनय यांनी बालसुलभ मराठीत केलेली रचना आहे.