सांगली जिल्ह्यातील विटा येथे १६ डिसेंबरला होणार अमृत मेळावा - अमृत महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यातील विटा येथे १६ डिसेंबरला होणार अमृत मेळावा

विटा (जि. सांगली) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे १६ डिसेंबर रोजी अमृत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

विटा (जि. सांगली) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे १६ डिसेंबर रोजी अमृत मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करते. त्यात ब्राह्मण समाजाचा समावेश आहे. कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी म्हणजे विद्यार्थी, तरुण, महिला, पुरुष, उद्योजक, शेतकरी, पुरोहित अशा सर्वांसाठी अमृत संस्थेच्या वेगवेगळ्या योजना आहेत. या योजनांची माहिती ब्राह्मण समाजातील, तसेच लक्ष्यित गटातील अन्य जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचावी, यासाठी हा अमृत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याला अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार आणि अमृतमित्र अभय कुलकर्णी उपस्थित राहणार असून, योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थितांना आपल्या मनातील शंका व प्रश्न आपल्याला विचारून थेट संवाद साधता येणार आहे. विटा येथे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम म्हणजे लाभार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. लक्ष्यित गटातील नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, तसेच आपल्यासह समाजाचा उत्कर्ष साधावा, असे आवाहन अमृतमित्र अभय सुधीर कुलकर्णी यांनी केले आहे. परिसरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवून मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.

मेळाव्याचे तपशील
दिवस : मंगळवार, १६ डिसेंबर २०२५
वेळ : सायंकाळी साडेपाच वाजता
स्थळ : गणपती मंदिर, ब्राह्मण गल्ली, विटा, जि. सांगली

अधिक माहितीसाठी संपर्क :
सांगली जिल्हा कार्यालय : 9112228766
शैलेंद्र जहागीरदार (जिल्हा व्यवस्थापक) : 7972830757
अभय कुलकर्णी (अमृतमित्र) : 7721927992

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 11-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 52 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news
Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 11-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 52 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement