खोपोलीमध्ये अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रमाला उत्तम प्रतिसाद - अमृत महाराष्ट्र

खोपोलीमध्ये अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रमाला उत्तम प्रतिसाद

स्थानिक उद्योजकांचे चाळीसहून अधिक स्टॉल्स; महिला दिनी होणार समारोप

खोपोलीमध्ये अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मुख्य फोटो
मुख्य फोटो

खोपोली (जि. रायगड) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रम सध्या खोपोलीमध्ये सुरू आहे. सहा मार्चला सुरू झालेल्या या उपक्रमाची सांगता आठ मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी दर्जेदार स्थानिक उत्पादनांच्या खरेदीसाठी या बाजारपेठेला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरण, लघुउद्योगांना चालना आणि स्वयंरोजगारनिर्मिती असे या उपक्रमाचे उद्देश आहेत. स्थानिक लघुउद्योजक आणि अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील विविध व्यावसायिक प्रशिक्षणे घेतलेल्या लाभार्थ्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि त्यांचे विक्रीकौशल्य वाढावे याकरिता अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जातो. खोपोलीमधील अमृतपेठेमध्ये स्थानिक उद्योजकांचे चाळीसहून अधिक स्टॉल्स आहेत. दर दिवशी लकी ड्रॉ कुपन काढून त्यातून तीन विजेते निवडून त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. अमृत संस्थेचे रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे, उपव्यवस्थापक मंगेश ढेबे, अमृतमित्र अमित कुलकर्णी अमित कुलकर्णी यांनी अमृतपेठेचे नियोजन केले असून, उद्योजक संजय तन्ना, भारती शहा, महर्षी यांचे विशेष योगदान यासाठी लाभले आहे. जास्तीत जास्त खोपोलीकरांनी या उपक्रमाला भेट द्यावी, असे आवाहन अमृत संस्थेचे कोकण विभागीय व्यवस्थापक अमित सामंत यांच्यासह सर्व आयोजकांनी केले आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 07-03-2026 News publication date | Time: 07:15 PM News publication time | Views: 69 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 07-03-2026 News publication date | Time: 07:15 PM News publication time | Views: 69 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement