गोंदिया जिल्ह्यात लोहारा येथे अ‍ॅडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात - अमृत महाराष्ट्र

गोंदिया जिल्ह्यात लोहारा येथे अ‍ॅडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात

अमृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

गोंदिया जिल्ह्यात लोहारा येथे अ‍ॅडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात  मुख्य फोटो
गोंदिया जिल्ह्यात लोहारा येथे अ‍ॅडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात  अतिरिक्त फोटो

देवरी (जि. गोंदिया) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदियाच्या देवरी तालुक्यातील लोहारा येथे अ‍ॅडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली. खुल्या प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांसाठी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे.

अमृत संस्थेचे गोंदिया जिल्हा व्यवस्थापक कार्तिक तिवारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे गोंदिया प्रकल्प अधिकारी रोशन तायवाडे, कार्यक्रम समन्वयक कलिंदर आझाद एन. मेश्राम, कार्यालयीन सहायक शिशुपाल मानकर, तसेच खुशियारा वनबंधू फाउंडेशनचे अध्यक्ष हिवराज राऊत उपस्थित होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना तांत्रिक कौशल्यप्राप्ती होणार आहे. अ‍ॅडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षण घेऊन उद्योग सुरू करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार असून, सीएमईजीपी-पीएमईजीपी कर्ज योजना, तसेच उद्योजकता विकासासाठी आवश्यक माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 10-03-2026 News publication date | Time: 11:51 AM News publication time | Views: 19 Number of times this news has been viewed | District: gondia Related district of the news
Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 10-03-2026 News publication date | Time: 11:51 AM News publication time | Views: 19 Number of times this news has been viewed | District: gondia Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement