सांगली : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि वाळवा ब्राह्मण सभा, वाळवा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, २० डिसेंबर २०२५ रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे अमृत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सांगली : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि वाळवा ब्राह्मण सभा, वाळवा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, २० डिसेंबर २०२५ रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे अमृत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम वाळवा ब्राह्मण सभेचे अध्यक्ष प्रमोद पांडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार प्रमुख वक्ते असतील. अमृतमित्र अभिजित कुलकर्णीदेखील या वेळी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधील कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी म्हणजे विद्यार्थी, तरुण, महिला, पुरुष, उद्योजक, शेतकरी, पुरोहित अशा सर्वांसाठी अमृत संस्था वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून काम करते. या योजनांची माहिती ब्राह्मण समाजाच्या प्रत्येकाला व्हावी यासाठी अमृत मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार व अमृतमित्र अभिजित कुलकर्णी उपस्थित राहून योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या मनातील प्रश्न व शंका विचारता येणार असून, थेट संवादातून शंकानिरसन करून घेता येणार आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच या भागात होत असून ही सुवर्णसंधी आहे. सर्व समाज बंधू-भगिनींनी कार्यक्रमाला उपस्थित राहून, या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्यासह समाजाचा उत्कर्ष साधावा असे आवाहन वाळवा ब्राह्मण सभेतर्फे करण्यात आले आहे.
दिवस : शनिवार, दि. २०/१२/२०२५
वेळ : सायंकाळी साडेपाच वाजता
स्थळ : श्री. प्रमोददादा ग्रामोपाध्ये, कोटभाग, वाळवा, ता. वाळवा, जि. सांगली
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment