अमृत संस्थेच्या नांदेड कार्यालयात महिला दिन साजरा - अमृत महाराष्ट्र

अमृत संस्थेच्या नांदेड कार्यालयात महिला दिन साजरा

महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

अमृत संस्थेच्या नांदेड कार्यालयात महिला दिन साजरा मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या नांदेड कार्यालयात महिला दिन साजरा अतिरिक्त फोटो

नांदेड : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या नांदेड कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि विचारांची देवाणघेवाण करून हा दिवस साजरा करण्यात आला. या वेळी अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी, उपव्यवस्थापक विश्वंभर जोशी, अमृतसखी मनीषा कुनसावळीकर, अमृतसखी संजना कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Saurabh Kulkarni News publisher name | Date: 10-03-2026 News publication date | Time: 09:45 PM News publication time | Views: 120 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news
Publisher: Saurabh Kulkarni News publisher name | Date: 10-03-2026 News publication date | Time: 09:45 PM News publication time | Views: 120 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement