पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्याकडून अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक - अमृत महाराष्ट्र

पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्याकडून अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक

संस्थेच्या योजनांविषयी देण्यात आली सविस्तर माहिती

पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्याकडून अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक मुख्य फोटो
मुख्य फोटो

पालघर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. अमृत संस्थेचे कोकण विभागीय व्यवस्थापक अमित सामंत आणि मुंबई जिल्हा व्यवस्थापक राजेश पवार यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची भेट घेऊन त्यांना अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. अमृतपेठ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, तसेच अमृतपेठ थेट बाजारपेठ या नव्या उपक्रमांसह विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचीही माहिती रानडे यांना देण्यात आली.

अमृत संस्थेतर्फे होत असलेल्या कार्याचे, तसेच संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी घेत असलेल्या परिश्रमांचे रानडे यांनी विशेष कौतुक केले. अमृत संस्थेतर्फे भविष्यात घेण्यात येणाऱ्या उपक्रमांना पालघर जिल्हा परिषदेकडून आवश्यक तिथे सहकार्य मिळावे, अशी विनंती अमित सामंत आणि राजेश पवार यांनी केली. रानडे यांच्याकडून त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Amit Samant News publisher name | Date: 11-03-2026 News publication date | Time: 07:07 PM News publication time | Views: 62 Number of times this news has been viewed | District: palghar Related district of the news
Publisher: Amit Samant News publisher name | Date: 11-03-2026 News publication date | Time: 07:07 PM News publication time | Views: 62 Number of times this news has been viewed | District: palghar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement