परभणीत २८ आणि २९ मार्चला भरणार अमृतपेठ थेट बाजारपेठ - अमृत महाराष्ट्र

परभणीत २८ आणि २९ मार्चला भरणार अमृतपेठ थेट बाजारपेठ

स्थानिक उत्पादकांच्या दर्जेदार उत्पादनांच्या खरेदीसह चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी

परभणीत २८ आणि २९ मार्चला भरणार अमृतपेठ थेट बाजारपेठ  मुख्य फोटो
मुख्य फोटो

परभणी : स्थानिक उद्योजकांना चांगली बाजारपेठ मिळावी आणि नागरिकांना दर्जेदार स्वदेशी उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करता यावीत, या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ हा विशेष उपक्रम राबवला जातो. राज्यातील अनेक शहरांमध्ये झालेल्या यशस्वी आयोजनानंतर २८ आणि २९ मार्च २०२६ रोजी ही बाजारपेठ परभणीमध्ये भरणार आहे.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. लक्ष्यित गटातील उत्पादक व स्थानिक उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने अमृतपेठ बाजारपेठ भरवली जाते. या माध्यमातून उत्पादक, विक्रेते यांना विक्रीसाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

परभणीतील प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वस्तू, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, कपडे, घरगुती पदार्थ, कलात्मक वस्तू, ज्वेलरी अशा अनेक उत्पादनांचे स्टॉल असतील. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे, स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना दर्जेदार व विश्वासार्ह उत्पादने मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे या सुवर्णसंधीचा स्थानिक उद्योजक, उत्पादकांनी लाभ घ्यावा. तसेच, नागरिकांनी कुटुंबासह या प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक लघुउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे व खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे परभणी जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केले आहे.

अमृतपेठ थेट बाजारपेठ :

दिवस आणि वेळ : २८ व २९ मार्च २०२६; सकाळी ९ ते रात्री ९ 

स्थळ : जागृती मंगल कार्यालय, वसमत रोड, परभणी

अधिक माहितीसाठी संपर्क : 7391065473, 9623531601, 7875105557

पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय, 

जुनी प्रशासकीय इमारत, 

पहिला मजला, बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला, परभणी.  

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 16-03-2026 News publication date | Time: 10:53 AM News publication time | Views: 172 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 16-03-2026 News publication date | Time: 10:53 AM News publication time | Views: 172 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement