दी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या जनरल सेक्रेटरींनी नाशिक विभागीय कार्यालयाला दिली भेट
नाशिक : दी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी हेमंत देशपांडे यांची अमृत संस्थेच्या नाशिक विभागीय कार्यालयाला भेट दिली. अमृत संस्थेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, खाडिलकर यांनी त्यांना संस्थेच्या योजनांची, उपक्रमांची आणि रचनेची माहिती दिली. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. ही संस्था विविध योजना तर राबवतेच, शिवाय लक्ष्यित गटातील युवक-युवतींमध्ये उद्योजकतावाढीसाठी विशेष उपक्रमही राबवते. अमृत संस्थेच्या या उपक्रमांचे हेमंत देशपांडे यांनी कौतुक केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment