नियोजन अधिकाऱ्यांनीही केली वाखाणणी
लातूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. लातूरच्या उपजिल्हाधिकारी संगीता टकले यांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती घेतली आणि योजनांचे कौतुक केले. या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर, सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी अधिक माहिती घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी संगीता टकले यांनी लातूर जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांना कार्यालयात बोलावले होते. या योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी काय मदत होईल, या अनुषंगाने या वेळी चर्चा झाली. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या उन्नतीसाठी अमृत संस्था विविध प्रकारे कार्य करत असते. अमृत संस्थेचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात असून, योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या कार्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी, तसेच जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी कौतुक केले.
अधिक माहितीसाठी संपर्क :
शुभम मुळजकर - 7391065470
लातूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
विनोद विजयराव अपसिंगेकर - 7499424355
जिल्हा उपव्यवस्थापक
कार्यालयाचा पत्ता :
अमृत संस्थेचे लातूर जिल्हा कार्यालय,
पहिला मजला, पितृछाया बिल्डिंग,
मयुरेश्वर अपार्टमेंट, सिग्नल कॅम्प,
विद्यानगर, लातूर - ४१३५१२
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment