अमृत संस्थेच्या योजनेतून निःशुल्क घेता आले दर्जेदार, रोजगाराभिमुख प्रशिक्षण
यवतमाळ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्यास मदत करत आहे. अमृत संस्थेकडून राबवण्यात येत असलेल्या ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेचा लाभ पीयूष विलास पारवेकर आणि राघव मंगेश कुळकर्णी यांनी घेतला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ड्रोनचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन युवकांना रोजगार व कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये ड्रोनचे तांत्रिक ज्ञान, उड्डाणाचे नियम, सुरक्षितता उपाययोजना, तसेच प्रत्यक्ष ड्रोन उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणामुळे युवकांना कृषी क्षेत्र, सर्वेक्षण, फोटोग्राफी, आपत्ती व्यवस्थापन, तसेच विविध औद्योगिक क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
पीयूष विलास पारवेकर आणि राघव मंगेश कुळकर्णी यांनी अमृत संस्थेच्या या योजनेचा लाभ घेऊन ड्रोन पायलट प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यामुळे इतर युवकांनाही अशा कौशल्याधारित प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.
अमृत संस्थेमार्फत युवकांना विविध कौशल्यविकास व रोजगाराभिमुख योजनांची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. इच्छुक युवकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक परीक्षित शर्मा यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९११२२२७६३३
पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय
स्वामी समर्थ विहार, पहिला माळा,
फ्लॅट क्रमांक ए-१,
अवधूतवाडी, तिवारी चौक,
यवतमाळ - ४४५ ००१
ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment