अहिल्यानगरमध्ये अमृत आनंद मेळावा; विद्यार्थ्यांना मिळाली नवी ऊर्जा

तपोवन रोडवरील बालगृह प्रकल्पात आयोजन

अहिल्यानगरमध्ये अमृत आनंद मेळावा; विद्यार्थ्यांना मिळाली नवी ऊर्जा मुख्य फोटो
अहिल्यानगरमध्ये अमृत आनंद मेळावा; विद्यार्थ्यांना मिळाली नवी ऊर्जा अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे लक्ष्यित गटाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अमृत वर्ग हा त्यातीलच एक महत्त्वाचा उपक्रम आहे. नगरमधील तपोवन रोड येथील बालगृह प्रकल्पा अमृतवर्गाचा अमृत आनंद मेळावा २६ एप्रिल रोजी उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

या वेळी अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी बालगृह प्रकल्पाचे संस्थाचालक योगेश गुंड यांचा यथोचित सन्मान केला. लहान मुलांनी केलेले स्वागत मन भारावून टाकणारे होते. या मेळाव्यात लहान मुलांसाठी विविध बौद्धिक, शारीरिक आणि संस्कारशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुलांना संस्कार, शिक्षण, मन, बुद्धी आणि शरीर यांचा समतोल विकास साधण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. बौद्धिक खेळ, प्रार्थना, योगासने, शारीरिक हालचाली, तसेच प्रेरणादायी सत्रांमुळे मुलांना एक सकारात्मक आणि प्रेरणादायी अनुभव मिळाला. विशेषतः योगासने, घोषणा, ओंकार आणि बौद्धिक खेळ घेण्यात आले.

या वेळी सागर भोपे यांनी सांगितले, की 'आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांचा सर्वांगीण विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. संस्कार, शिक्षण आणि मन, बुद्धी, शरीर यांचा समतोल राखला तरच मुलांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते.'

या वेळी योगशिक्षक मुकेश साठ्ये यांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगप्रात्यक्षिके करून घेतली. या वेळी अमृत मित्र सुजल झुंजारे उपस्थित होते. बालगृह प्रकल्पाचे योगेश गुंड यांनी या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यात अशा उपक्रमांचे अधिक व्यापक स्वरूपात आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच दर रविवारी अमृतवर्ग आयोजित करण्याचे ठरवले.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9112228769

जिल्हा कार्यालय : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणीसमोर, 

प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 27-04-2026 News publication date | Time: 10:22 AM News publication time | Views: 670 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 27-04-2026 News publication date | Time: 10:22 AM News publication time | Views: 670 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement