पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याच्या आठ वर्षे आधीपासून सुरू आहे उत्सव
लोकमान्य टिळकांनी १८९३ साली पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याच्या आठ वर्षे आधीच सोलापुरात मानाच्या आजोबा गणपतीच्या उत्सवाची सुरुवात झाली होती. येथील १८८५मधील पहिली मूर्ती वयोवृद्ध आजोबांसारखी पायाची घडी घालून बसलेली होती. त्या रूपामुळे भाविक या गणपतीला प्रेमाने आजोबा गणपती म्हणू लागले.
सोलापूरमधील शुक्रवार पेठेतील कार्यकर्त्यांनी गणरायाच्या या उत्सवाला प्रारंभ केला. यामध्ये मल्लिकार्जुन कवळे, महालिंगप्पा वजीरकर, मल्लिकार्जुनप्पा शेटे, संगनबसय्या नंदीमठ, देवबा मंठाळकर आदींचा सहभाग होता. पहिल्या वर्षी म्हणजे १८८५ साली या गणेशाची मूर्ती पर्यावरणस्नेही सामग्री वापरून तयार करण्यात आली. त्याकरिता कागद, कापड, कामट्या, खळ, डिंक यांचा वापर करण्यात आला. आजही ही पर्यावरणस्नेही अर्थात इको-फ्रेंडली परंपरा कायम आहे.
माणिक चौक (गुरुवार पेठ) येथील मंदिरात ही भव्य मूर्ती असून तिचे अवयव सोन्याचे आहेत. उजवा हात आशीर्वाद मुद्रेत असून हातात शिवपिंडी आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment