सातारा जिल्ह्यात नावनोंदणी सुरू
सातारा : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना रोजगार आणि कौशल्यविकासाच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेतर्फे अमृत ड्रोन मिशन हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमातून खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील युवकांना मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार असून, ग्रामीण भागातील तरुणांसाठी हे एक मोठे संधीचे दार ठरत आहे.
आज शेती, सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन, उद्योग, चित्रिकरण, लॉजिस्टिक्स आणि सुरक्षा क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित ड्रोन पायलटची मागणी दिवसेंदिवस वाढत असून या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर अमृत संस्था युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे.
या प्रशिक्षणामध्ये ड्रोन हाताळणी, सुरक्षा नियम, डिजिटल मॅपिंग, कृषी क्षेत्रातील वापर, हवाई सर्वेक्षण आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यात येणार आहे. विशेषतः ग्रामीण युवकांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देत त्यांना आत्मनिर्भर आणि रोजगारक्षम बनवण्यावर भर दिला जात आहे.
अमृत संस्थेच्या या उपक्रमामुळे सातारा जिल्ह्यातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवीन करिअर संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. “तंत्रज्ञान गावागावात आणि संधी प्रत्येक युवकापर्यंत” हा उद्देश समोर ठेवून अमृत संस्था सातत्याने युवकांच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अविनाश कुलकर्णी 78419 52681
अमृत जिल्हा कार्यालय - 9112227638
या योजनेविषयी अधिक वाचा या लिंकवर...
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment