अमृत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची कौशल्यविकास संस्थांना भेट

युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोर्सेसची घेण्यात आली माहिती

अमृत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची कौशल्यविकास संस्थांना भेट मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची कौशल्यविकास संस्थांना भेट अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : युवक-युवतींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी अमृत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT) आणि इंडो-जर्मन टूल रूम (IGTR) या संस्थांना भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विविध कौशल्याधारित प्रशिक्षण कोर्सेसची माहिती घेतली.

या वेळी त्या संस्थांमधील आधुनिक प्रशिक्षण सुविधा, प्रयोगशाळा, तांत्रिक साधने, तसेच विद्यार्थ्यांना दिले जाणारे रोजगाराभिमुख प्रशिक्षण याबद्दल माहिती घेऊन पाहणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी विविध कोर्सेसचे स्वरूप, कालावधी, शासकीय मान्यता, रोजगाराच्या संधी आणि उद्योजकता विकासाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांना या प्रशिक्षणांच्या माध्यमातून नोकरी, तांत्रिक कौशल्य आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. तसेच समाजातील अधिकाधिक युवकांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवून त्यांना प्रशिक्षण कार्यक्रमांशी जोडण्यासाठी अमृत संस्था पुढाकार घेणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या वेळी अमृत संस्थेचे राज्य समन्वयक दीपक जोशी, नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर, पुणे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी, संभाजीनगर विभागीय उपव्यवस्थापक ओंकार शेटे, संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, तसेच उपव्यवस्थापक योगेश रोडे उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण संस्थांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करून युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 13-05-2026 News publication date | Time: 10:42 AM News publication time | Views: 659 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 13-05-2026 News publication date | Time: 10:42 AM News publication time | Views: 659 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement