अमृत संस्थेच्या योजनेतून युवकांना मोफत ड्रोन प्रशिक्षण व परवाना

लवकरात लवकर अर्ज करण्याचे छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचे आवाहन

अमृत संस्थेच्या योजनेतून युवकांना मोफत ड्रोन प्रशिक्षण व परवाना मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या योजनेतून युवकांना मोफत ड्रोन प्रशिक्षण व परवाना अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : आजच्या काळात शेती, फोटोग्राफी, सर्वेक्षण, सुरक्षा तसेच अनेक तांत्रिक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी साधारणपणे मोठा खर्च करावा लागतो; मात्र राज्य शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांना हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जात आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अधिकृत ड्रोन पायलट परवानाही दिला जातो.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध कौशल्यविकास आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. त्याअंतर्गत अमृत ड्रोन मिशन या उपक्रमातून ड्रोन ऑपरेटर (पायलट) प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचा लाभ राज्यातील अनेक युवक घेत असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्याची चांगली संधी उपलब्ध होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळाव्यात हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षणाचा कालावधी १० दिवसांचा असून, प्रशिक्षण कालावधीत राहण्याची आणि जेवणाची संपूर्ण मोफत व्यवस्था अमृत संस्थेमार्फत केली जाते. प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

या योजनेचा लाभ खुल्या प्रवर्गातील अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिला जातो, ज्यांना इतर कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळांचा लाभ मिळत नाही.अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे.

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचे वय १८ ते ५५ वर्षांदरम्यान असावे. तसेच तो किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शेतकरी कुटुंबातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. अर्जासोबत वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करणेही आवश्यक राहणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. 

अधिक माहितीसाठी संपर्क :

अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475

छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

योगेश भास्करराव रोडे - 9403200606

जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड, सेक्टर ४, 

सिडको, हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

छत्रपती संभाजीनगर 

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 15-05-2026 News publication date | Time: 04:37 PM News publication time | Views: 771 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 15-05-2026 News publication date | Time: 04:37 PM News publication time | Views: 771 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

D
Dhiraj Sharma
16-05-2026 10:24 AM

I am exited the trening of drown.

Write a Comment
0 / 50 words
Advertisement