विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा परभणीत सत्कार

अखिल भारतीय पेशवा संघटनेतर्फे आयोजन

विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा परभणीत सत्कार मुख्य फोटो
मुख्य फोटो

परभणी : इयत्ता दहावी व बारावीमध्ये विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा अखिल भारतीय पेशवा संघटनेतर्फे परभणीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक योजना, कौशल्य विकासप्रशिक्षण व रोजगाराभिमुख उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व व्यावसायिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या IGTR, NIELIT, CDAC यांसारख्या संस्थांसोबतच्या शैक्षणिक योजनांविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत कौशल्यविकासालाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला अखिल भारती पेशवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन वाडे पाटील, परळी वैजनाथचे नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ समाजसेवक बंडूनाना सराफ, एल. आर. फार्माचे डॉ. सुधीर राजूरकर, पत्रकार राजन मंगरूळकर, पत्रकार गणेश पांडे, अखिल भारतीय पेशवा संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष दीपक कासांडे, रोहित कनकदंडे यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 19-05-2026 News publication date | Time: 10:51 AM News publication time | Views: 174 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 19-05-2026 News publication date | Time: 10:51 AM News publication time | Views: 174 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement