छत्रपती संभाजीनगरमध्ये गुजराती महिला होम फ्ली ग्रुपच्या बैठकीत मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती देण्यासाठी गुजराती समाजाचे अध्यक्ष राजेश मेहता यांच्या पुढाकाराने गुजराती महिला होम फ्ली ग्रुपची बैठक घेण्यात आली. या बैठकीला रीता कोठेवाला, प्रगती कपाडिया, प्रिया पटेल आणि दीपा ठक्कर या उपस्थित होत्या. अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी उपस्थित राहून संस्थेच्या विविध योजनांची सोप्या भाषेत माहिती दिली.
ड्रोन प्रशिक्षण, अमृत बेकरी, सोलार इन्स्टॉलेशन टेक्निशियन अर्थात अमृत सूर्यमित्र, अमृत आयात-निर्यात, अमृतपेठ थेट बाजारपेठ, अमृत ई प्लॅटफॉर्म , अमृत आरीवर्क, अमृत ग्लॅमर (ब्युटी पार्लर), सेंद्रिय शेती, अमृत महाराष्ट्र - पत्रकारिता, अमृत पर्यटन, अमृत वर्ग, तसेच अमृत उद्यम कौशल्य प्रशिक्षण (EDP) या योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संस्थेच्या इतर उपक्रमांचीही थोडक्यात माहिती देण्यात आली. योजनांसाठी लागणारी कागदपत्रे, अर्ज कसा करायचा आणि पुढील प्रक्रिया काय असते याबद्दलही माहिती समजावून सांगण्यात आली.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
योगेश भास्करराव रोडे - 9403200606
जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड, सेक्टर ४,
सिडको, हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment