नाशिक कार्यालयातर्फे आयोजन
नाशिक : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि नाशिक जाट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने १७ मे रोजी अमृत संवाद बैठक आयोजित करण्यात आली. जाट समाजाचे अधिकारी धनसिंग बाजे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक संजय गोसावी, अमृतमित्र मयूर हातवळणे, तसेच मालेगावचे अमृतमित्र अजिंक्य कन्नल या वेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील जातींसाठी काम करते आणि त्यात जाट समाजाचा समावेश आहे. खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना अन्य कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींतील आर्थिक दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी म्हणजे विद्यार्थी, तरुण, महिला, पुरुष, उद्योजक अशा सर्वांसाठी अमृत संस्था वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून काम करते. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना, व्यावसायिकांसाठी वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना, अमृत कौशल्य प्रशिक्षण योजना आदींची माहिती जाट समाजाला व्हावी यासाठी ही अमृत संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment