अहिल्यानगरमध्ये २३-२४ मे रोजी अमृतपेठ; ग्राहकांना लुटता येणार स्वदेशी उत्पादनांच्या खरेदीचा आनंद

अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

अहिल्यानगरमध्ये २३-२४ मे रोजी अमृतपेठ; ग्राहकांना लुटता येणार स्वदेशी उत्पादनांच्या खरेदीचा आनंद मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर : अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रमातून दर्जेदार स्वदेशी उत्पादनांच्या खरेदीचा आनंद अहिल्यानगरवासीयांना पुन्हा एकदा लुटता येणार आहे. २३ मे रोजी सकाळी ११ वाजता अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी अमृत संस्थेच्या संशोधन अधिकारी सुमेधा देशपांडे व नाशिक विभागाचे व्यवस्थापक मंगेश खाडिलकर हेही उपस्थित राहणार आहेत.

स्थानिक उत्पादकांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे 'अमृतपेठ - थेट बाजारपेठ' हा विशेष उपक्रम राबवला जातो. अहिल्यानगरमध्ये मार्च महिन्यात भरलेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा या उपक्रमाचे आयोजन अहिल्यानगरमध्ये करण्यात आले असून, २३ आणि २४ मे २०२६ रोजी ही अमृतपेठ भरणार आहे. दर्जेदार स्वदेशी उत्पादने हे अमृतपेठेचे वैशिष्ट्य असून, ग्राहक आणि उत्पादक अशा दोघांसाठीही हा उपक्रम फायद्याचा ठरतो. स्थळ आणि अन्य तपशील बातमीच्या शेवटी दिले आहेत.

अमृतपेठ थेट बाजारपेठेत या वस्तू असतील उपलब्ध

या व्यतिरिक्त सर्व शासकीय योजनांची माहिती देणारा आणि नोंदणी करून घेणारा स्टॉलही अमृतपेठेमध्ये असेल. दर्जेदार स्वदेशी उत्पादनांच्या खरेदीसाठी कुटुंबासाह अवश्य भेट द्यावी, असे आवाहन अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले आहे 

अमृतपेठ थेट बाजारपेठ

दिनांक : २३ आणि २४ मे २०२६

वेळ : सकाळी नऊ ते रात्री नऊ

स्थळ : ऋग्वेद भवन हॉल, चितळे रोड, अहिल्यानगर

अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक : 9112228769

जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणीसमोर, 

प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 21-05-2026 News publication date | Time: 11:41 AM News publication time | Views: 319 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 21-05-2026 News publication date | Time: 11:41 AM News publication time | Views: 319 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement