ब्राह्मण उद्योगब्रह्म स्नेहमेळाव्यात अमृतच्या योजनांची माहिती

सामाजिक जबाबदारीचे भान लक्षात घेऊन 26 वर्षापासून सुरू असलेल्या बदलापुर मधील सत्कर्म बालकाश्रमात ब्राह्मण उद्योगब्रह्म चा स्नेहमेळावा संपन्न झाला त्यात अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली गेली.

 ब्राह्मण उद्योगब्रह्म  स्नेहमेळाव्यात अमृतच्या योजनांची माहिती  मुख्य फोटो
 ब्राह्मण उद्योगब्रह्म  स्नेहमेळाव्यात अमृतच्या योजनांची माहिती  अतिरिक्त फोटो

बदलापूर येथील ही संस्था १८ वर्षे वयापर्यंतच्या अनाथ मुलांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून गेली 25 वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे आणि पारदर्शी सेवा देणारी संस्था आहे. संस्थापक अध्यक्ष म्हणून काम बघणारे श्री.मकरंद वढवेकर हे स्वतः उच्चविद्याविभूषित आहेत. आपल्या कामाचा मोठा व्याप असून देखील या कामात दर रविवारी पूर्णवेळ आणि इतर वेळी गरजेनुसार ते या आश्रमात उपलब्ध असतात. आपले सर्व कौशल्य वापरून देणगी उभी करतात. अभ्यासासह आरोग्य, क्रीडा, कौशल विकास यावरही या संस्थेत विशेष बहर दिला जातो, जेणेकरून ही मुळे अनाथ असली तरी त्यांचा सर्वांगीण विकास होतो. या मेळाव्यात उपस्थित सर्व लघुउद्योजकांना अमृत संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये विशेषतः उद्योजक विकास प्रशिक्षण (EDP) कार्यक्रमाची माहिती देऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी व विकसित करण्यासाठी आवश्यक कौशल्ये, व्यवसाय नियोजन, विपणन, आर्थिक व्यवस्थापन आणि शासकीय योजनांचा लाभ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अमृतपेठ (ऑनलाइन व ऑफलाइन विक्री व्यासपीठ) याविषयी माहिती देऊन उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांसाठी अधिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या संधी समजावून सांगण्यात आल्या. या संवादात्मक सत्रामध्ये अनेक उद्योजकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अमृतच्या योजनांबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला व भविष्यातील प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: माया रत्नपारखी -खेत्रे News publisher name | Date: 09-06-2026 News publication date | Time: 06:50 PM News publication time | Views: 9 Number of times this news has been viewed | District: Thane Related district of the news
Publisher: माया रत्नपारखी -खेत्रे News publisher name | Date: 09-06-2026 News publication date | Time: 06:50 PM News publication time | Views: 9 Number of times this news has been viewed | District: Thane Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement