जालन्यात अमृत संस्थेतर्फे मोफत मोबाइल फिल्म-मेकिंग कोर्स; नावनोंदणी सुरू - अमृत महाराष्ट्र

जालन्यात अमृत संस्थेतर्फे मोफत मोबाइल फिल्म-मेकिंग कोर्स; नावनोंदणी सुरू

त्वरित कोर्सला प्रवेश घ्या आणि मोबाइलला बनवा कमाईचे साधन!

जालन्यात अमृत संस्थेतर्फे मोफत मोबाइल फिल्म-मेकिंग कोर्स; नावनोंदणी सुरू मुख्य फोटो
मुख्य फोटो

जालना : आजच्या डिजिटल युगात तरुण-तरुणींना त्यांच्या मोबाइलमधूनच क्रिएटिव्ह काम करता यावे व त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत जालन्यात मोबाइल फिल्म मेकिंग प्रोफेशनल कोर्स घेतला जाणार आहे. हा कोर्स मोफत असून, अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील उमेदवारांना त्याचा लाभ घेता येणार आहे.

खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना इतर कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अमृत संस्था विविध कौशल्यविकास उपक्रम राबवत आहे. या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कोर्समध्ये मोबाइल वापरून सिनेमॅटिक व्हिडिओ शूटिंग, लायटिंग, फ्रेमिंग, साउंडची मूलभूत माहिती, प्रोफेशनल मोबाइल एडिटिंग, स्टोरीटेलिंग, स्क्रिप्ट रायटिंग, तसेच सोशल मीडियासाठी रील्स व शॉर्ट फिल्म्स तयार करण्याचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह दिले जाणार आहे.
तसेच या कोर्समध्ये सहभागी विद्यार्थ्यांना फ्रीलान्सिंग कसे करावे, स्वतःचा पोर्टफोलिओ कसा तयार करावा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून उत्पन्न कसे मिळवावे, याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

या योजनेसह अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ खुल्या प्रवर्गातील ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार आदी जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना घेता येणार आहे.

नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क :
नितीन खेकाळे - 9130283058, 7391065474
जालना जिल्हा व्यवस्थापक, अमृत

चिंतेश जोशी - 94219 44752
जालना जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत संस्थेचे जालना जिल्हा कार्यालय,
विशाल कॉर्नर, चंदनझिरा, जालना

Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 24-12-2025 News publication date | Time: 03:19 PM News publication time | Views: 354 Number of times this news has been viewed | District: jalna Related district of the news
Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 24-12-2025 News publication date | Time: 03:19 PM News publication time | Views: 354 Number of times this news has been viewed | District: jalna Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 2 Comments

S
Santosh Prasadrao borde
06-01-2026 01:09 PM

मोबाईल बनवण्याचे फोर्स जॉईन करायचा आहे

a
akash dethe
01-01-2026 05:55 AM

मोबाइल फिल्म-मेकिंग कोर्स Join करण्यास इच्छुक आहे 🙌

Write a Comment
0 / 50 words
Advertisement