निःशुल्क उपक्रमासाठी लवकरात लवकर नावनोंदणी करण्याचे आवाहन
अहिल्यानगर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अहिल्यानगरमध्ये सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन आणि देखभाल प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निःशुल्क उपक्रमासाठी लवकरात लवकर नावनोंदणी करण्याचे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेच्या अमृत कौशल्य उद्यम योजनेअंतर्गत सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन आणि देखभाल याचे निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील उमेदवारांसाठी असेल. त्या संदर्भातील माहिती शेवटी दिली आहे.
- पात्रता
- वयोगट : १८ ते ५५ वर्षे
- शिक्षण : किमान दहावी पास
- कुटुंबाचे उत्पन्न : आठ लाख रुपयांपेक्षा कमी
आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे
- शाळा सोडल्याचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न दाखला
- शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र / गुणपत्रक
- अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट)
प्रवेश नोंदणीसाठी प्रशिक्षण केंद्र
श्री कृष्णा इन्स्टिट्यूट
सिद्धीबागजवळ, बागडपुडी रोड, दिल्लीगेट, अहिल्यानगर
संपर्क :
7058686100, 7378686100
अधिक माहितीसाठी संपर्क :
पत्ता : अमृत कार्यालय, वरुण अपार्टमेंट,
आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी,
अहिल्यानगर-414003
संपर्क : 9112228769
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment