अमृत संस्थेचे कार्य अल्पावधीत राज्यभरात योग्य पद्धतीने पोहोचल्याबद्दल समाधान - अमृत महाराष्ट्र

अमृत संस्थेचे कार्य अल्पावधीत राज्यभरात योग्य पद्धतीने पोहोचल्याबद्दल समाधान

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळाज यांनी अहिल्यानगरमध्ये घेतला आढावा

अमृत संस्थेचे कार्य अल्पावधीत राज्यभरात योग्य पद्धतीने पोहोचल्याबद्दल समाधान मुख्य फोटो
अमृत संस्थेचे कार्य अल्पावधीत राज्यभरात योग्य पद्धतीने पोहोचल्याबद्दल समाधान अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कार्य अहिल्यानगरच्या सर्व तालुक्यांसह संपूर्ण राज्यात योग्य पद्धतीने पोहोचल्याबद्दल इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळाज यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी आज (तीन जानेवारी) अमृत संस्थेच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्याचा आढावा घेतला.

अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी श्री. धुळाज यांना संस्थेच्या जिल्ह्यातील कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. सागर भोपे यांनी जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये घेतलेल्या विविध मेळाव्यासंदर्भात तपशीलवार माहिती दिली. त्याचप्रमाणे जिल्हा व्यवस्थापक या नात्याने भोपे यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील भेट दिलेल्या सर्व गावांची माहिती व अमृतच्या लक्षित गटातील लोकसंख्येची तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या गाठीभेटी व तिथे केलेल्या कामकाजाची माहिती देखील दिली. अमृतच्या विविध योजनानिहाय लाभार्थ्यांची माहिती सादर केली. अमृत संस्थेचे अमृत मित्र आणि अमृत सखी यांच्या भेटी झाल्यात. आणि यांच्यामार्फत अमृत योजनांच्या प्रचाराची अभिनव कार्यपद्धती ऐकून आनंद व्यक्त केला. अमृत वर्ग या उपक्रमाबद्दल त्यांनी अधिक माहिती जाणून घेतली व या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. अहिल्यानगर येथील एकंदर अमृतच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रत्येक जिल्ह्यात अहिल्यानगरप्रमाणे संस्थेचे कार्य व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अमृत संस्थेने आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी नुकत्याच प्रकाशित केलेल्या अमृत दिनदर्शिका उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. त्यांनाही दिनदर्शिकेची एक प्रत भेट देण्यात आली. अमृत संस्थेच्या एकंदर सर्व कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

अहिल्यानगरमधील सुधीर नगरकर हे अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचे प्रथम लाभार्थी आहेत. त्यांचा या वेळी श्री. धुळाज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी अमृत कार्यालयातील डेटा ऑपरेटर गौरी कुलकर्णी आणि अमृतमित्र सुजल झुंजारे उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 09:41 PM News publication time | Views: 1,346 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 09:41 PM News publication time | Views: 1,346 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 4 Comments

j
jignesh kamani
05-01-2026 03:02 PM

अभिनंदन

V
Vijay Joshi
04-01-2026 01:13 PM

माननीय सचिव श्री आप्पासाहेब धुळाज सर यांनी अमृतच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतला. आणि अमृत संस्थेच्या जिल्ह्यातील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे कामकाज चालू आहे आणि अमृतच्या लक्षित गटात तील जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी अमृतचे सर्व जिल्हा व्यवस्थापक अशीच मेहनत घेत आहेत.

m
mahesh garde
04-01-2026 10:41 AM

अभिनंदन.

सागर भोपे
03-01-2026 09:53 PM

खूप सकारात्मक भेट झाली. अमृत चे कार्य करण्यास यामुळे चांगली प्रेरणा मिळाली.

Write a Comment
0 / 50 words
Advertisement