छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात त्यांना देण्यात आली योजनांची माहिती
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने तयार केलेली दिनदर्शिका शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांना भेट देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी भिडे गुरुजींना संस्थेच्या योजनांसह सर्व उपक्रमांची माहिती दिली. अमृत संस्थेच्या विविध योजना, प्रशिक्षण उपक्रम आणि समाजासाठी उपयोगी माहिती अमृत दिनदर्शिकेत देण्यात आली असून, ती दिनदर्शिका सर्वसामान्य नागरिकांना उपयुक्त ठरणारी आहे. ही दिनदर्शिका भिडे गुरुजींना भेट देण्यात आली. अमृत संस्थेच्या उपक्रमांना गुरुजींनी शुभेच्छा दिल्या.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय,
पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment