सद्गुरू श्री चंद्रशेखरमहाराज देगलूरकर यांनी दिल्या अमृत संस्थेच्या कार्याला शुभेच्छा - अमृत महाराष्ट्र

सद्गुरू श्री चंद्रशेखरमहाराज देगलूरकर यांनी दिल्या अमृत संस्थेच्या कार्याला शुभेच्छा

औत्सुक्याने जाणून घेतले संस्थेचे कार्य

सद्गुरू श्री चंद्रशेखरमहाराज देगलूरकर यांनी दिल्या अमृत संस्थेच्या कार्याला शुभेच्छा मुख्य फोटो
सद्गुरू श्री चंद्रशेखरमहाराज देगलूरकर यांनी दिल्या अमृत संस्थेच्या कार्याला शुभेच्छा अतिरिक्त फोटो

नांदेड : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी यांनी श्री गुंडा महाराज महासंस्थानाचे (देगलूर आणि पंढरपूर) विद्यमान पिठाधीश सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांची सदिच्छा भेट घेतली. जोशी यांनी महाराजांना अमृत संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. महाराजांनी अतिशय औत्सुक्याने अमृतच्या कार्याविषयी जाणून घेतले. कार्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. या वेळी महाराजांना अमृत संस्थेची दिनदर्शिका देण्यात आली. दिनदर्शिकेत इंग्रजी तारखांबरोबरच हिंदू पंचांगाचाही ठळकपणे समावेश केल्याबद्दल महाराजांनी आनंद व्यक्त केला.

अमृत संस्थेविषयी... 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in

केदार गोगरकर - 9112227635


Publisher: Vishweshwar Joshi News publisher name | Date: 12-01-2026 News publication date | Time: 07:39 PM News publication time | Views: 645 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news
Publisher: Vishweshwar Joshi News publisher name | Date: 12-01-2026 News publication date | Time: 07:39 PM News publication time | Views: 645 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement