बेरोजगारांसाठी अमृत म्हणजे दिशा देणारे केंद्र
निलंगा (जि. लातूर) : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेने आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी तयार केलेली विशेष दिनदर्शिका निलंगा निरीक्षण अधिकारी अमोल पाटील यांना भेट देण्यात आली. अमृत संस्थेचे लातूर जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांनी अमृत संस्थेच्या योजनांची माहिती त्यांना दिली. या वेळी अमृत संस्थेचे लाभार्थी अमोल कुलकर्णी, ऋषिकेश कुलकर्णी, अजय कुलकर्णी उपस्थित होते. अमृत संस्था खूप चांगला उपक्रम राबवत असून, बेरोजगार व्यक्तींसाठी ही संस्था एक ऊर्जा देऊन नवी दिशा देणारे केंद्र आहे, असे पाटील यांनी सांगितले.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment