अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यात नावनोंदणी सुरू - अमृत महाराष्ट्र

अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यात नावनोंदणी सुरू

खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना मोफत, दर्जेदार व्यावसायिक प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यात नावनोंदणी सुरू मुख्य फोटो
मुख्य फोटो

धुळे : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. लक्ष्यित गटातील घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने अमृत संस्थेमार्फत विविध मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यात विविध प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे धुळे जिल्हा व्यवस्थापक हेमंत पाठक यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत अमृत उद्यम कौशल्यवर्धन, अमृत सूर्यमित्र, अमृत बेकरी प्रशिक्षण आदी सर्व प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णतः मोफत असून, प्रशिक्षणानंतर स्वतःच्या उद्योग सुरू करण्यास, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी त्वरित अमृत कार्यालयाशी संपर्क साधून या प्रशिक्षण योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत व्यवसाय आणि उद्योजकता परिचय, सूक्ष्म, लघू आणि घरगुती उद्योगांची संकल्पना, व्यक्तिमत्त्व विकास आणि व्यवसाय निवड, व्यवसाय परवाने आणि नोंदणी, कच्चा माल गुणवत्ता व खरेदी, आर्थिक नियोजन व्यवसायातील खर्चाचे प्रकार, ब्रँडिंग व पॅकेजिंग, उद्योगांची जाहिरात, विक्री व बाजार व्यवस्थापन, संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन, अमृतपेठ नोंदणी व बाजार जोडणी इत्यादींचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, डोमिसाइल प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत.

अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना इतर कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, राजपूत, यलमार, सिंधी, गुजराती, मारवाडी,पटेल,पाटीदार, ठाकूर, कोमटी, कायस्थ, जाट, बनिया, वंशी, नायर, अय्यंगार, बंगाली, त्यागी, सेनगुजर, नायडू, एलमार इत्यादी २४ जातींचा समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी अमृत संस्थेच्या धुळे कार्यालयात विलास चंद्रात्रे, वैशाली कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा. 

मोबाइल : ९११२२२८७७२

पत्ता : २६, महाराणा प्रताप कॉलनी, 

जुन्या चिरंतन/विघ्नहर्ता हॉस्पिटलजवळ,

धुळे

Publisher: हेमंत पाठक News publisher name | Date: 23-01-2026 News publication date | Time: 11:29 AM News publication time | Views: 65 Number of times this news has been viewed | District: dhule Related district of the news
Publisher: हेमंत पाठक News publisher name | Date: 23-01-2026 News publication date | Time: 11:29 AM News publication time | Views: 65 Number of times this news has been viewed | District: dhule Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement