अहिल्यानगरमध्ये अमृत कौशल्य उद्यम योजनेअंतर्गत विविध निःशुल्क प्रशिक्षणांसाठी नावनोंदणी सुरू - अमृत महाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये अमृत कौशल्य उद्यम योजनेअंतर्गत विविध निःशुल्क प्रशिक्षणांसाठी नावनोंदणी सुरू

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सुसंधी

अहिल्यानगरमध्ये अमृत कौशल्य उद्यम योजनेअंतर्गत विविध निःशुल्क प्रशिक्षणांसाठी नावनोंदणी सुरू मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. लक्ष्यित गटातील घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने अमृत संस्थेमार्फत विविध मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अमृत उद्यम कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अहिल्यानगर शहरात विविध प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले आहे. 

या योजनेअंतर्गत अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण, अमृत मोबाइल फिल्म मेकिंग, अमृत आरीवर्क, अमृत ग्लॅमर (ब्युटी पार्लर) प्रशिक्षण यांचा समावेश होतो. हे सर्व प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णतः मोफत असून, यासाठी अनेक लाभार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. अजूनही नावनोंदणी सुरू असून, इच्छुकांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करावी. प्रशिक्षणानंतर स्वयंरोजगार सुरू करता येणार असून, रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासही मदत होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अमृत कार्यालयाशी संपर्क साधून या प्रशिक्षण योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे, वैभव कुलकर्णी, गौरी कुलकर्णी व शरद क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल : 9112228769.

कार्यालय पत्ता : अमृत, वरुण अपार्टमेंट,

आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी, 

अहिल्यानगर - 414003

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 01-02-2026 News publication date | Time: 10:27 AM News publication time | Views: 475 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 01-02-2026 News publication date | Time: 10:27 AM News publication time | Views: 475 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement