भाजपचे मुंबई महापालिकेतील गटनेते गणेश खणकर यांनी घेतली माहिती
मुंबई : अंधेरी येथील रवींद्र जोशी मेडिकल फाउंडेशनतर्फे मुंबईतील लोकप्रतिनिधींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभामध्ये अमृत संस्थेतर्फे एक स्टॉल लावण्यात आला होता. त्या स्टॉलवर लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या. भाजपचे मुंबई महापालिकेतील गटनेते गणेश खणकर यांचाही त्यात समावेश होता. त्यांनी अमृत संस्थेविषयी संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या कार्यालयामध्ये या संदर्भात अधिक चर्चा झाली. त्यांच्या वॉर्डमधील अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटाला संस्थेच्या योजनांचा लाभ कशा प्रकारे देता येईल, याबद्दल त्यात सकारात्मक चर्चा झाली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment