अमृत संस्थेच्या योजनांचा आकाशवाणीवरून होणार जागर - अमृत महाराष्ट्र

अमृत संस्थेच्या योजनांचा आकाशवाणीवरून होणार जागर

अहिल्यानगर आकाशवाणी केंद्रातील अंकुश जोशी यांनी कार्यालयाला भेट देऊन घेतली माहिती

अमृत संस्थेच्या योजनांचा आकाशवाणीवरून होणार जागर मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या योजनांचा आकाशवाणीवरून होणार जागर अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अहिल्यानगर कार्यालयाला नगर आकाशवाणी केंद्रातील अधिकारी अंकुश जोशी यांनी भेट दिली. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी त्यांना अमृत संस्थेच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली. ते अहिल्यानगरमधील भिंगार उपनगर येथील एक यशस्वी उद्योजक आहेत. अमृत संस्थेच्या योजनांचा प्रसार करण्यासाठी सहकार्य करण्याची सकारात्मकता त्यांनी दर्शवली. त्यांना अमृत दिनदर्शिका देण्यात आली. लवकरच आकाशवाणी केंद्रावरून अमृत संस्थेच्या सर्व योजनांच्या माहितीप्रसाराकरिता मुलाखत प्रसारित केली जाणार आहे. या वेळी अमृत संस्थेचे वैभव कुलकर्णी व शरद क्षीरसागर उपस्थित होते. 

मोबाइल : 9112228769.

कार्यालय पत्ता : अमृत, वरुण अपार्टमेंट,

आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी, 

अहिल्यानगर - 414003

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 09-02-2026 News publication date | Time: 11:52 PM News publication time | Views: 268 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 09-02-2026 News publication date | Time: 11:52 PM News publication time | Views: 268 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement