खुल्या प्रवर्गातील लघुउद्योजक आणि छोट्या व्यावसायिकांना व्यवसायवाढीची सुवर्णसंधी
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेतर्फे अहिल्यानगरमध्ये येत्या १४ आणि १५ मार्च २०२६ रोजी अमृतपेठ एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे. लघुउद्योजक आणि छोट्या व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची विक्री करून व्यवसायवृद्धी करता यावी, हा त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे अहिल्यानगरमधील लघुउद्योजकांनी तातडीने नोंदणी करून या एक्झिबिशनमध्ये स्टॉल बुकिंग करावे, असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.
अहिल्यानगरमध्ये अमृतपेठ एक्झिबिशनचे आयोजन प्रथमच केले जात आहे. १४ आणि १५ मार्च रोजी सकाळी नऊ ते रात्री १० या वेळेत हे एक्झिबिशन होणार असून, त्याचे ठिकाण खाली दिले आहे. स्टॉलसाठी जागा मर्यादित असल्याने व्यावसायिकांनी लवकर नोंदणी करावी, असे आवाहन अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले आहे.
यामध्ये सहभागी होणाऱ्या लघुउद्योजकांना अमृतपेठ डॉट कॉम या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोफत नोंदणी करता येणार आहे. त्याचबरोबर सहभागी स्टॉलधारकांना अमृतपेठ ऑफलाइन उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल अमृत संस्थेचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. प्रदर्शनस्थळी स्वतंत्र टेबल, दोन दिवसांच्या स्टॉलसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉलव्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी अमृत संस्था कार्यरत असून, या लक्ष्यित गटातील व्यावसायिकांसाठी हे प्रदर्शन म्हणजे व्यवसायवृद्धीची उत्तम संधी आहे. दोन दिवसांचे स्टॉल शुल्क अत्यल्प असून, अहिल्यानगर कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन सागर भोपे यांनी केले आहे.
अमृतपेठ एक्झिबिशन
दिनांक : १४, १५ मार्च २०२६
वेळ : सकाळी नऊ ते रात्री १० वा.
ठिकाण : व्हाइट हाउस, ड्रायफ्रूट हाउसच्या मागे, कोहिनूर मॉलजवळ, सावेडी, अहिल्यानगर.
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क :
सागर भोपे : 9766622274
अजय जोशी : 9822785277
अमृत कार्यालय : 9112228769
पत्ता : अमृत कार्यालय, आकाशवाणी केंद्रासमोर, प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment