अमृत पेठ बाजार पेठ - आता कारंजा येथे

अमृतपेठ च्या माध्यमातून स्वदेशीच्या साह्याने करुया आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल

अमृत पेठ बाजार पेठ - आता कारंजा येथे मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी 'अमृत' यांच्या वतीने वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे 'अमृतपेठ थेट बाजारपेठ' या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १० जून रोजी श्री नृसिंह स्वामी सरस्वती महाराज संस्थान, कारंजा, जिल्हा वाशिम येथे हा उपक्रम सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुला राहील. स्थानिक उत्पादक, महिला, ग्रामीण उद्योग आणि स्वदेशी वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

यामध्ये लोणचे, पापड, मसाले, ढोकळा प्रीमिक्स, ज्वेलरी, कपडे, हॅन्डमेड वस्तू, घर सजावटीच्या वस्तू, साड्या, पूजा साहित्य, देवाचे वस्त्र याशिवाय शासनाच्या विविध योजनांची माहिती असेल. दर्जेदार खरेदीची खात्री देणारी अमृतपेठ तुमच्यासाठी या संकल्पनेवर आधारित आहे. या उपक्रमास कारंजाकरानी मोठ्या प्रमाणात भेट द्यावी, असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक योगेश जोशी यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क - 9112227634

Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 09-06-2026 News publication date | Time: 07:37 AM News publication time | Views: 86 Number of times this news has been viewed | District: Washim Related district of the news
Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 09-06-2026 News publication date | Time: 07:37 AM News publication time | Views: 86 Number of times this news has been viewed | District: Washim Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement