चिमुकल्यांच्या उत्साहाने रंगला अमृत वर्ग

दि. १० जून २०२६ रोजी रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल, छ. संभाजीनगर येथे अमृत वर्गाचे आयोजन करण्यात आले. अमृत सखी सौ. मंजू कुलकर्णी यांनी हा संस्कार वर्ग घेतला.

चिमुकल्यांच्या उत्साहाने  रंगला अमृत वर्ग मुख्य फोटो
चिमुकल्यांच्या उत्साहाने  रंगला अमृत वर्ग अतिरिक्त फोटो

रायझिंग स्टार इंग्लिश स्कूलमध्ये अमृत वर्ग उत्साहात संपन्न छ. संभाजीनगर, दि. १० जून २०२६ (बुधवार) : रायझिंग स्टार इंग्लिश स्कूलमध्ये आज अमृत वर्गाचे आयोजन करण्यात आले होते . या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आनंदाने व उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा कवरे तसेच शाळेतील शिक्षिका उपस्थित होत्या. अमृत वर्गाचे मार्गदर्शन अमृत सखी सौ. मंजू कुलकर्णी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या नैतिक, बौद्धिक व सांस्कृतिक विकासासाठी शाळेत दर बुधवारी नियमितपणे अमृत वर्ग घेतला जातो. या वर्गामध्ये प्रार्थना, दैनंदिन चांगल्या सवयी, बोधकथा, बालगीते तसेच विविध रंगांची नावे विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. संवादात्मक पद्धतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, आत्मविश्वास आणि अभिव्यक्ती कौशल्य वाढण्यास मदत झाली. बालगीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला तसेच विविध कृतींमधून कार्यानुभवाचा अनुभव घेतला. अमृत वर्गातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमूल्ये, शिस्त, स्वच्छतेची सवय, वडीलधाऱ्यांबद्दल आदरभाव आणि सकारात्मक विचारांची जडणघडण करण्यावर विशेष भर देण्यात आला. उपक्रम रंजक व ज्ञानवर्धक असल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि भरभरून आनंद लुटला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. शाळेत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे पालकांकडूनही कौतुक होत असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी तो उपयुक्त ठरत आहे. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 10-06-2026 News publication date | Time: 01:05 PM News publication time | Views: 27 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 10-06-2026 News publication date | Time: 01:05 PM News publication time | Views: 27 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement