उद्योजकतेकडून स्वावलंबनाकडे- सोलापूर येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण

सोलापुरात 'अमृत' संस्थेतर्फे ८ जून रोजी 'उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमा'चे उद्घाटन झाले.

 उद्योजकतेकडून स्वावलंबनाकडे- सोलापूर  येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण   मुख्य फोटो
 उद्योजकतेकडून स्वावलंबनाकडे- सोलापूर  येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण   अतिरिक्त फोटो

सोलापुरात 'अमृत' संस्थेतर्फे ८ जून रोजी 'उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमा'चे उद्घाटन!



सोलापूर: 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ) सोलापूर परिवार यांच्या वतीने आयोजित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे (EDP) काल, सोमवार दिनांक ०८ जून २०२६ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता उद्घाटन झाले. "उद्योजकतेकडून स्वावलंबनाकडे" हे ध्येय समोर ठेवून तरुणांमधील कौशल्य, आत्मविश्वास आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी या विशेष प्रशिक्षण वर्गाची सुरुवात करण्यात आली आहे.


​या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. मोहिनी ताई पत्की, प्रा. प्रमोद कानडे सर आणि श्री. राजेश खत्री सर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून या प्रशिक्षण सत्राचा अधिकृत प्रारंभ करण्यात आला. ​या प्रशिक्षण कार्यक्रमातून नवउद्योजकांना व्यवसायाच्या विविध संधी, वित्तीय नियोजन आणि बाजारपेठेशी जोडणी याविषयी तज्ज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे.


अधिक माहितीसाठी सोलापूर येथील अमृतच्या जिल्हा कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Publisher: Shreyas Kulkarni,Birudev Waghmode, Arya kulkarni News publisher name | Date: 09-06-2026 News publication date | Time: 10:36 AM News publication time | Views: 34 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news
Publisher: Shreyas Kulkarni,Birudev Waghmode, Arya kulkarni News publisher name | Date: 09-06-2026 News publication date | Time: 10:36 AM News publication time | Views: 34 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement