अमृतच्या EDP प्रशिक्षणातून युवकांना उद्योजकतेची नवी दिशा- फलटण येथे बॅचचे उद्घाटन

फलटण येथे महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) बॅचचे उद्घाटन उत्साहात संपन्न आहे.

अमृतच्या EDP प्रशिक्षणातून युवकांना उद्योजकतेची नवी दिशा- फलटण येथे बॅचचे उद्घाटन मुख्य फोटो
मुख्य फोटो

फलटण, दि. ६ जून : महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) बॅचचे उद्घाटन शनिवार, दि. ६ जून रोजी सकाळी १०.३० वाजता फलटण येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य व्यवस्थापक दीपक जोशी सर आणि विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी सर यांच्या नेतृत्वाखाली या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

फलटण परिसरातील युवक-युवती, महिला व नवउद्योजकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सातारा जिल्हा उपव्यवस्थापक अविनाश कुलकर्णी आणि अमृत मित्र स्वानंद जोशी यांनी विशेष पुढाकार घेत या EDP बॅचचे नियोजन केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे लाभार्थ्यांची नोंदणी करून बॅच यशस्वीरित्या सुरू करण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महेश बर्वे व डॉ. प्राची बर्वे उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. महेश बर्वे म्हणाले की, "आजच्या काळात युवकांनी केवळ नोकरीच्या संधी शोधण्यापेक्षा उद्योजकतेकडे वळण्याची गरज आहे. उद्योजकता विकास कार्यक्रमासारखे उपक्रम युवकांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, आत्मविश्वास आणि दिशा देतात. अमृत संस्था समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, महिला आणि युवकांसाठी विविध उपयुक्त योजना राबवत असून त्यांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे."

ते पुढे म्हणाले की, "स्वावलंबी समाज घडविण्यासाठी उद्योजकता अत्यंत महत्त्वाची आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाल्यास अनेक युवक यशस्वी उद्योजक बनू शकतात. अमृतचे कार्य कौतुकास्पद असून अशा उपक्रमांमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे."


कार्यक्रमादरम्यान अमृतच्या विविध योजना, स्वयंरोजगाराच्या संधी, शासकीय योजनांचा लाभ, अमृत पोर्टलवरील मोफत नोंदणी तसेच उद्योजकता विकासाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. सातारा जिल्हा व्यवस्थापक विनायक पाठकजी व सातारा जिल्हा उपव्यवस्थापक अविनाश कुलकर्णी यांनी उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन करून विविध योजनांची माहिती दिली.


कार्यक्रमास लाभार्थी, युवक-युवती व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून परिसरातील युवकांना उद्योग-व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होऊन स्वयंरोजगाराला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या संदर्भात आणखी माहितीसाठी सातारा अमृत कार्यालयास संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


गजानन वाटवे यांचे २ एप्रिल २००९ मध्ये वृद्धापकाळाने निधन झाले.


-संकलित

Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 07-06-2026 News publication date | Time: 09:48 AM News publication time | Views: 54 Number of times this news has been viewed | District: Satara Related district of the news
Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 07-06-2026 News publication date | Time: 09:48 AM News publication time | Views: 54 Number of times this news has been viewed | District: Satara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement