बीडमध्ये सुरू झाले अमृत उद्योग कौशल्यवर्धन आणि अमृत आरीवर्क प्रशिक्षणवर्ग - अमृत महाराष्ट्र

बीडमध्ये सुरू झाले अमृत उद्योग कौशल्यवर्धन आणि अमृत आरीवर्क प्रशिक्षणवर्ग

उत्साहात उद्घाटन; दोन्ही वर्गांना लाभार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद

बीडमध्ये सुरू झाले अमृत उद्योग कौशल्यवर्धन आणि अमृत आरीवर्क प्रशिक्षणवर्ग मुख्य फोटो
बीडमध्ये सुरू झाले अमृत उद्योग कौशल्यवर्धन आणि अमृत आरीवर्क प्रशिक्षणवर्ग अतिरिक्त फोटो

बीड : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारचे निःशुल्क, पण दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. त्यापैकी अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण आणि अमृत आरीवर्क प्रशिक्षण या दोन प्रशिक्षणवर्गांचा प्रारंभ बीड शहरात झाला आहे. सहयोगनगरातील श्री गुरुनानक दरबार येथे उद्घाटन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बीडमध्ये अमृत संस्थेतर्फे पहिल्यांदाच हे दोन्ही प्रशिक्षण वर्ग स्वतंत्र स्वरूपात सुरू करण्यात आले असून, प्रत्येकी २० लाभार्थ्यांच्या दोन बॅचेस सुरू झाल्या आहेत. 

उद्घाटन कार्यक्रमाला अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक ओंकार शेटे, समर्थ नर्सिंग स्कूलचे संचालक व उद्योजक डॉ. प्रशांत देशपांडे, दीनदयाळ शोध संस्थानचे संचालक गंगाधर देशमुख, अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी, दीनदयाळ शोध संस्थानच्या सौ. सीमा मनूरकर, तसेच अमृत संस्थेचे बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी व जिल्हा उपव्यवस्थापक दिगंबर जोशी उपस्थित होते.

उद्घाटनावेळी ओंकार शेटे यांनी अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी संस्था कौशल्य प्रशिक्षण, व्याजपरतावा योजनेसह विविध रोजगाराभिमुख योजना राबवत असल्याचे सांगितले. लाभार्थ्यांनी केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करावा, असे सांगून व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावर अमृत संस्था सोबत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या वेळी अमृतपेठ उपक्रमाबाबतही माहिती देण्यात आली.

उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात दीनदयाळ शोध संस्थान संचालित जनशिक्षण संस्थानचे संचालक गंगाधर देशमुख यांनी उद्योजकता म्हणजे काय, तिची व्याप्ती आणि विविध व्यवसाय संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले. व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणी येतील; मात्र त्यावर मात करून, लोक काय म्हणतील याचा विचार न करता पुढे जात राहिले तरच यश मिळते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल जोशी यांनी केले. तसेच सौरभ कुलकर्णी आणि सीमा मनूरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी अमृत आरीवर्क प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षिका प्रांजली उमापूरकर यांचे संस्थेतर्फे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा टाकळकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन दिगंबर जोशी यांनी केले.

अमृत संस्था विविध कौशल्यविषयक प्रशिक्षण कार्यक्रम नियमितपणे राबवत असून इच्छुकांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून पुढील प्रशिक्षणवर्गासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65468

पत्ता : अमृत संस्थेचे बीड जिल्हा कार्यालय,

अथर्व कॉम्प्लेक्स, नवगण कॉलेज रोड, 

वाघ नेत्रालयाशेजारी, बीड

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 17-02-2026 News publication date | Time: 07:53 PM News publication time | Views: 132 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 17-02-2026 News publication date | Time: 07:53 PM News publication time | Views: 132 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement